उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालय यांचे वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे दि .24 व 25 डिसेंबर या कालावधीत सांस्कृतीक हॉल, कामगार कल्याण केंद्र, उस्मानाबाद येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुढील कलाप्रकाराचा समावेश आहे.
लोकनृत्य, लोकगीत, एकांकीका (हिंदी/ इंग्रजी), शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी/कर्नाटकी), शास्त्रीय वाद्य ( सितार, बासरी, वीणा, तबला, मृदुंग, हार्मोनियम(लाईट), गिटार), शास्त्रीय नृत्य (मणीपुरी, ओडीसी, भरतनाट्यम, कथ्थक, कुचीपुडी प्रत्येकी एक प्रमाणे), वक्तृत्व (हिंदी/दंग्रजी). याकरिता 15 ते 35 वयोगटातील कलाकारांनी बाबनिहाय प्रवेशिका सादर करण्यासाठी जन्मतारखेच्या पुराव्यासह दि. 23 डिसेंबर, 2013 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडीयम येथे संपर्क साधावा. यासाठी पुढील सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होणा-या युवक/ युवतीचे वय 15 ते 35 वर्ष वयोगटातील असणे आवश्यक आहे.,उपरोक्त कला प्रकारात सहभागी संघानी/कलाकारांनी आवश्यक असलेले साहित्य स्वत: आणावे आयोजकांमार्फत फक्त माईकची व्यवस्था करण्यात येईल. 3. आपल्या कलाप्रकारासाठी साथ संगीत व वाद्याची व्यवस्था स्वत: करणे आवश्यक आहे. 4. सर्व बाबीसाठी वेळेचे बंधन राहील. जास्तीचा वेळ गुणांकनासाठी ग्राहय धरला जाणार नाही.. 5. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. 6. आयोजनात ऐनवेळी बदल करण्याचा अधिकार आयोजकास राहील. 7. सर्व स्पर्धकांनी आपली उपस्थिती दि. 24 डिसेंबर, 2013 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत स्पर्धेच्या ठिकाणी संयोजकांकडे द्यावी. उशिरा येणाऱ्या प्रवेशिका स्विकारल्या जाणार नाहीत. तरी जिल्यातील जास्तीत जास्त कलाकारांनी यात सहभाग नोदवावा असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी संजीव कुलकर्णी यांनी केले आहे.