उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्यातील सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, अन्न सुरक्षा कायदा 2006 व त्याखालील नियमांतर्गत अन्न व्यवसाय करणा-या व्यावसायिकांना अन्न व औषध प्रशासन उस्मानाबाद यांचे तर्फे सुचित करण्यात येते की, अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अन्न व्यवसाय करणारे उत्पादक, अन्न प्रक्रीया केंद्र या व्यवसायींकांनी अन्न सुरक्षा कायदा 2006 अंतर्गत परवाने घेणे बंधनकारक आहे. परवाना न घेतल्यास व सदर व्यवसायींकांचा व्यवसाय चालु आढळल्यास त्यांच्याविरुध्द न्यायालयात खटला दाखल करण्याची मुभा आहे. तसेच 5 लाख रुपये दंडाची तरतुद अन्न सुरक्षा कायद्याअंर्गत करण्यात आलेली आहे.
    अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अन्न पदार्थांचे उत्पादन, तसेच दुध व दुग्धजन्य पदार्थांचे संकलन व शितकरण केल्यावर अन्न उत्पादकांनी अन्न उत्पादक केंद्रिय परवानाधारक/ राज्य परवानाधारक/ नोदणी धारक यांनी नमुद मुदतीत फॉर्म D-1 व D-2 सहामाही किंवा वार्षिक रिटर्न भरणे त्या उत्पादकाची जबाबदारी आहे.जर उत्पादकाने परतावा रिटर्न विहित मुदतीत सादर न केल्यास प्रती दिन रु. 100 दंडाची तरतुद करण्यात आली आहे.सर्व उत्पादन कक्षेत मोडत असलेल्या अन्न उत्पादकांनी परतावा भरुन पोच घ्यावी जेणे करुन दंड भरण्यापासुन आपणास सुटका मिळु शकते.
     जिल्यातील लहान, मोठ्या व्यावसायीकांनी परवाने नोदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) तथा पदनिर्देशित अधिकारी, अन्न व औषध प्रशासन (म.रा.), उस्मानाबाद यांनी केले आहे
.
 
Top