उस्मानाबाद -: जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने, कल्टिव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर इत्यादी पुरवठा योजनेसाठी अर्ज करावेत. सदर योजनेसाठी अर्ज करणा-या स्वयंसाहयता बचत गटातील सर्व सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. एकुण सदस्यांपैकी 80% सदस्य अनुसूचित जातीचे असणे आवश्यक आहे. सदर अटी पुर्ण करणाऱ्या बचत गटांना मिनि ट्रॅक्टर व इतर साहित्यासाठी शासनाकडुन रु तीन लाख पंधरा हजार इतके अनुदान देण्यात येणार आहे. जिल्यासाठी 21 मिनी ट्रॅक्टरचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. तरी इच्छुक बचत गटांनी सविस्तर माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधावा. तसेच कार्यालयातील विहित नमुन्यातील अर्ज चेकलिस्टप्रमाणे कागदपत्रांसह 31/12/2013 पुर्वी सादर करावेत. तसेच प्रलंबित असणाऱ्या बचत गटांनीसुध्दा चालू आर्थिक वर्षात या योजनेचा लाभ घेण्यासाठी नव्याने अर्ज करावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण उस्मानाबाद यांनी केले आहे.                      
 
Top