उस्मानाबाद :- विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत साकार, नवी दिल्ली पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित उद्योजगता प्रशिक्षण कार्यक्रम उस्‍मानाबाद येथे दि. 26 डिसेंबर ते 24 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उद्योजगता स्वत:मध्ये कशी रुजवावी, तसेच लघु उद्योग ते उत्पादन उद्योगाची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. विज्ञान शाखेची पदवीका/पदवीधर असणे आवश्यक आहे. वय 18 ते 35 वर्षामध्ये आसावे. सोबत टी.सी., मार्कमेमो, ओळखपत्र, रेशनकार्ड, व 3 फोटो आवश्यक आहे.
      या प्रशिक्षणमध्ये व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण, प्रकल्प अहवाल तयार करणे, जाहिरात व विक्री कला, यशस्वी उद्योजकांचे अनुभव, संबंधित उद्योग प्रकल्पांना भेटी, उद्योग निवडीचे तंत्र, बाजारपेठ सर्वेक्षण व विश्लेषण, सुक्ष्म, मध्यम लघुउद्योग मंत्रालयाच्या योजना, सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, एस.एस.आय. रजिस्ट्रेशन, एम.आय.डी.सी. भूखंड, आय.एस.आय. ट्रेडमार्क संबंधी माहिती, लोगो परवाना, उद्योगाला लागणारे परवाने,अन्नधान्य प्रक्रीया उद्योग, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती, मिनरल वॉटर, कुलस्टोरेज, वेअर हाऊस उभारणी संबंधी माहिती, जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार आहे. यासंबंधी अधिक माहिती व प्रवेश अर्जाकरिता कार्यक्रम समन्वयक, राजकुमार गायकवाड,  (मो.नं.9011213701/7385924621) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पांडुरंग कांबळे, क.प्रकल्प अधिकारी, एमसीईडी व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, प्रशासकीय इमारतीसमोर, उस्मानाबाद यांनी केले आहे.                                 
 
Top