उस्मानाबाद :- सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षातील भारत सरकार शिषवृत्ती व शिक्षण फी, परीक्षा फी या शिष्यवृत्ती ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख २१ डिसेंबर असून मागील शैक्षणिक वर्ष २०१२-१३ मध्ये एकुण २०३६० विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतलेला आहे. तरी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्ग, या प्रवर्गातील भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परिक्षा फी या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी मुदतीत ऑनलाईन अर्ज भरावेत.
       तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती सन 2013-14 या शैक्षणिक वर्षापासून ई-स्कॉलरशिप योजनेत समावेश करण्यात आलेला असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील. सदर बाबत संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी. व विद्यार्थ्यास अडचणी आल्यास संबंधितानी त्वरीत मदत करावी. जर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज न भरल्यास विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्यावर राहील. तसेच 2012-13 या आर्थिक वर्षात महाविद्यालयाच्या Logong ID वर असलेले मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित रहणार नाहीत याकरिता त्यांचे फॉर्म या कार्यालयाकडे Forward करण्यात यावेत.
Online शिष्यवृत्ती बाबत अधिक माहिती E.Scholarship/Maha.E.Scholarship या Website वर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरताना 10 वी च्या परिक्षेचा आसन क्रमांक आणि उत्तीर्ण झाल्याचे वर्ष ही माहिती सोबत ठेवणे आवश्यक आहे.
       या संदर्भात काहीही अडचण असल्यास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top