स्‍वप्‍न पाहिले मी तुझे,
जे नाही झाले कधी सत्‍य, 
कळलं नाही मला,
प्रेम झालं तुझ्यावर फक्‍त,
ह्दयात आहेस फक्‍त तूच,
नाही तुझ्याविना कोणी,
स्‍वप्‍नांच्‍या दुनियेत नेहमीच येतीस तू,
नाही दाखविले स्‍वप्‍न या नयनी,
आपली पहिली भेट एक आठवण बनून गेली,
तुझे ते पाहणं आणि माझं हरवणं,
कसं एकदाच घडून गेली,
आलीस जीवनात एक स्‍वप्‍नपरी बनून,
जीवन बदलून टाकलीस,
हे वेडं विसर देत ना तुला,
आठवण येई प्रत्‍येक क्षणोक्षणाला.
                                                                      - स्‍वप्‍नील चटगे
 
Top