बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील पंचरत्न क्रिडा, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक संस्थेच्यावतीने शिवाजी नगर येथील संकेश्वर उद्यान जवळील बस थांब्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे.
    सन 2011-12 मध्‍ये आमदार निधीतून शहरात विविध ठिकाणी बस थांबे करण्‍यात आले. शिवाजीनगर परिसरातील बसथांबा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील जागेचा वापर करुन तयार करण्‍यात आला आहे. शहरातील अशाच प्रकारच्‍या महात्‍मका गांधी उद्यानालगत करण्‍यात आलेल्‍या बस थांब्‍यास महात्‍मा गांधी बस थांबा असे नामकरण करण्‍यात आले आहे. त्‍याचप्रकारे याही बसथांब्‍याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर बस थांबा असे नाव द्यावे, अशी मागणी शहरातील दलित बांधवांनी केली आहे.
 
Top