बार्शी -: कृषी पदवीधरांच्या प्रश्नासाठी स्थापन झालेल्या संघटनेच्या बार्शी तालुकाध्यक्षपदी पानगांव (ता. बार्शी) येथील सुहास काळे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष महेश कडूस यांनी काळे यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. यावेळी उपाध्यक्ष शरद कदम, गजानन वडणे, अनिकेत गायकवाड, संदिप पाटील, सयाजी शेटे, बाळासाहेब येमनर, राहुल पाटील, विवेक जाधव, कुणाल बाबर आदीजण उपस्थित होते.