बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : लोकमंगल कॉलेज वडाळा येथे घेण्यात झालेल्या विभागीय वुशू स्पर्धेत १६५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यामध्ये पुणे जिल्ह्यास प्रथम क्रमांक, सोलापूर जिल्ह्यास द्वितीय, नगर जिल्ह्यास तृतीय क्रमांक मिळाला. स्पर्धेची सुरुवात उत्तर सोलापूर पंचायत समिती सदस्य इंद्रजीत पवार, जिल्हा वुशू संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब साठे यांच्या हस्ते या करण्यात आली. पारितोषिक वितरण माढा येथील माजी शिवसेना तालुकाप्रमुख तात्या मस्के, लोकमंगल महाविद्यालयाचे क्रिडा विभाग प्रमुख सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भा.ज.पा. सोलापूरचे सरचिटणीस सतिश आरगडे, उपाध्यक्ष धनंजय जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन दत्तात्रय जाधवर, आभार फुलचंद जावळे यांनी केले.
 
Top