पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी (ता. बार्शी) येथे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दिलीपराव सोपल यांचा वाढदिवस विविध सामाजिक, विधायक उपक्रमांनी व कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
पांगरी येथील गुरूदत्त तंत्रशिक्षण महाविद्यालयात संस्थाध्यक्ष विक्रांत गरड यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला. तसेच सावित्रीबार्इ फुले वस्तीगृहातील विद्यार्थांना अध्यक्ष वसंत गरड यांच्या हस्ते मिष्ठान्नाचे वाटप करण्यात आले. नरसिंह ग्रुपतर्फे अध्यक्ष स्वप्नील काळे यांच्या हस्ते गावातील गरजुंना चादर वाटप करण्यात आले. यावेळी गावातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.