पांगरी (गणेश गोडसे) :- सामार्इक विहीरीवरील पाणी देण्‍याच्या बारीवरून चौघांनी मिळुन एकाला लोखंडी कोयत्याने व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करूण गंभीर जखमी केल्याची घटना सोमवार दि. १६ डिसेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजण्‍याच्या सुमारास कोरेगांव (ता. बार्शी) शिवारात घडली. 
       लक्ष्मण सोपान रामगुडे (वय ४९, रा. कोरेगांव, ता. बार्शी) असे कोयता हल्‍ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतक-याचे नांव असुन शिवाजी सोपान रामगुडे, अशोक सोपान रामगुडे, चंद्रकला शिवाजी रामगुडे व लता शिवाजी रामगुडे (सर्वजण रा. कोरेगांव, ता. बार्शी) अशी मारहाण करून जखमी करण्‍यास कारणीभुत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत.
      जखमी लक्ष्मण रामगुडे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आरोपींनी संगनमत करून शेतातील सामार्इक विहीरीवरील पाणी देण्‍याच्या बारीच्या कारणावरून शिवाजी रामगुडे यांने हातातील लोखंडी, कायत्याने मारून जखमी केले. तसेच इतर आरोपींनी शिवीगाळ दमदाटी करत हाताने लाथाबुक्यांनी व चपलने मारहाण करून शेतात येऊन बघ तुला बघतोच असे म्हणुन धमकी दिली. पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्‍यात आला असुन अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top