नळदुर्ग : घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करून दागिने व रोख रक्कम असे मिळून एकूण 35 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची नळदुर्ग येथील व्यंकटेशनगर येथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
संतोष पवार हे आपल्या व्यंकटेशनगर येथील घरास कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील रोख 8 हजार रुपये व सोने-चांदीचे दागिने असा 35 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी नेताजी बिराजदार यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.