नळदुर्ग :- काँग्रेस कमिटीच्या नळदुर्ग शहराध्यक्षपदी येथील नवाझ काझी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या बळकटीसाठी प्रयत्न करावेत, तसेच गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.