सोलापूर -: केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे हे पंढरपूर तालुक्याच्या दौ-यावर आले असता त्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर त्यांना पोलिस विभागाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. तत्पुर्वी पंढरपूरच्या नगराध्यक्षा उज्वला भालेराव यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, आ. भारत भालके, तहसिलदार सचिन डोंगरे, विष्णुपंत कोठे, कल्याणराव काळे, प्रकाश पाटील, बाळासाहेब शेळके, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, सुधीर खरटमल आदी मान्यवर उपस्थित होते.

.jpg)