नळदुर्ग :- येथील मैलारपूर येथे रविवार रोजी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. या दिवशी 'श्री' ची  पानाची पुजा बांधण्यात आली होती.
      श्री खंडोबाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. पंचक्रोशितील हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.भाविकांनी श्री खंडोबाच्या शिखरावर भाविकांनी खोबरे आणि भंडारा उधळत येळकोट,येळकोट,जय मल्हारचा जयघोष केला.दिवसभरात दहा हजाराहून अधिक भाविकांनी श्री खंडोबाचे दर्शन घेवून आपली मनोकामना पुर्ण केली.
       सर्व भाविकांना श्री खंडोबा मंदिर समितीच्या वतीने मोफत अन्नदान करण्यात आले.या अन्नदानासाठी अनेक भाविकांनी सढळ हातानी मदत केली. 

 
Top