पांगरी (गणेश गोडसे) :- जुन्या भांडणाचा राग मनात धरून तिघांना लोखंडी गज खुरपे व काठीने बेदम मारहाण करूण गंभीर जखमी केल्याची घटना शनिवार दि. 21 डिसेंबर रोजी सावरगांव-कापशी (ता.बार्शी) येथील येमाई मंदिरासमोर घडली.योगेश सुर्यभान यादव, सुरेखा सुर्यभान यादव व सुर्यभान यादव अशी गजहल्यात गंभीर जखमी झालेल्या मायलेकरांची नांवे असुन अभिजित गोवर्धन गर्जे व गोवर्धन अभिमान गर्जे (दोघेही रा.सावरगांव) अशी हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल दाखल झालेल्यांची नांवे आहेत.
जखमी योगेश यादव यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आरोपींनी पाठिमागे झालेल्या भांडणाचा राग मनात धरूण त्यांची आई सुरेखा यादव यांना शिवीगाळ दमदाटी करून मारहाण करण्यास सुरूवात केली. तेव्हा त्यांचे वडील विचारणा करण्यास गेले असता त्यांनाही आरोपींनी लोखंडी गजाने व हातातील लोखंडी खुरप्याने मारहाण करून जखमी केले. तसेच फिर्यादी घराकडे येत असताना पुन्हा आरोपींनी त्यांनाही लोखंडी गज व काठीने डोक्यात मारून जखमी केले. पांगरी पोलिसात आरोपींविरूध्द मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी फरार झाले आहेत. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.