उस्मानाबाद :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ उस्मानाबाद विभागातर्फे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपक्रम सुरु केले असून ते पुढीलप्रमाणे आहेत.
     तोटयात चालणा-या फे-यांच्या गावांना भेटी देऊन सदर फेऱ्यांचा प्रवाशी प्रतिसाद वाढावा याकरिता डिसेंबरमध्ये ग्रामसंपर्क विशेष अभियान राबविण्यात येत असून त्यामध्ये महामंडळाने सुरु केलेल्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात येत आहे,लग्न, सहलीसाठी देण्यात येणाऱ्या प्रासंगिक कराराच्या दरात २२ टक्के कपात केली असून काही अटी शिथील करण्यात आल्या आहेत. शालेय सहलीसाठी ५० टक्के सवलत आहे, पोलीस आणि परिवहन खात्याच्या सहकार्याने प्रत्येक बस स्थानकाच्या परिघक्षेत्रात नो पार्कींग झोनची प्रभा‍वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. अवैध प्रवासी  वाहतुक करणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे, त्रैमासिक पासेस व प्रवास भाडयात वर्षभर १० टक्के सवलत व  १ लाख ५० हजार रुपयांचा विमा उपलब्ध करुन देणारे सवलत कार्ड योजनांचा प्रचार / प्रसार करण्यात येत आहे.
         चालक, वाहकामध्ये जागरुकता निर्माण होऊन प्रवाशी वाढीकडे त्यांचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यांना उत्पन्नाचे उद्यीष्ट देवून त्यांना प्रवाशी वाढीसाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. याचा पुरेपुर फायदा प्रवाशी जनतेने घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक नवनीत भानप, उस्मानाबाद यांनी केले आहे.    
 
Top