कळंब (बालाजी जाधव) :- कळंब येथे शिवराज्‍य पक्षाच्‍या जिल्‍हा मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते.
    कळंब येथील शुभमंगल कार्यालयात पार पडलेल्‍या मेळाव्‍यास पक्षाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष सुधीर सावंत यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्‍या प्रारंभी सावंत यांच्‍या हस्‍ते छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्यास पुष्‍पहार अर्पण करुन शिवाजी चौक ते मंगल कार्यालयापर्यंत भव्‍य रॅली काढण्‍यात आली.
    यावेळी व्‍यासपीठावर पक्षाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष सुधीर सावंत, जिल्‍हाध्‍यक्ष बलराज रणदिवे, मराठवाडा अध्‍यक्ष संजय उनगे, अपंग प्रहार संघटनेचे जिल्‍हाध्‍यक्ष मयुर काकडे, मज्‍जीत कुरेशी, सागर बारात यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना सुधीर म्‍हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी न्‍याय हक्‍काचे रयतेचे राज्‍य निर्माण केले. तेच कार्य पुढे शिवराज्‍य पक्ष करत आहे, असेही ते म्‍हणाले. यावेळी शिवराज्‍य पक्षात प्रवेश केलेल्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या निवडी करण्‍यात आल्‍या.
    कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी तालुकाध्‍यक्ष बालाजी मडके, शहराध्‍यक्ष आदित्‍य हंडिबाग, विशाल गायकवाड, शिवकुमार खबाले, शुभम राखुंडे, राजेश काळे, कुलदिप सावंत, राहुल चव्‍हाण, गोविंद चौधरी, कृष्‍णा चव्‍हाण, सिध्‍दार्थ क्षिरसागर आदींनी परिश्रम घेतले.
 
Top