नळदुर्ग -: ऐतिहासिक नळदुर्ग शहराच्‍या वैभवात भर घालण्‍यासाठी येथील प्राचीन भुईकोट किल्‍ला बीओटी तत्‍वावर देण्‍याचा निर्णय झाले असून त्‍याचा शासकीय आदेश लवकरच निघणार असल्‍याचे राज्‍याचे दुग्‍धविकास, पशुसंवर्धन व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांनी नळदुर्ग येथे एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
    नळदुर्ग नगरपालिकेच्‍यावतीने महाराष्‍ट्र सुवर्ण जयंती नगरोत्‍थान योजनेंतर्गत अंबाबाई मंदीर येथे कम्‍युनिटी हॉल बांधकामाचे भूमीपूजन व अंबाबाई मंदिराजवळील घाटाचे लोकार्पण सोहळा रविवार रोजी संपन्‍न झाला. यावेळी ना. मधुकरराव चव्‍हाण हे बोलत होते. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सिध्‍देश्‍वर सहकारी बँक लातूरचे चेअरमन सि.ना. आलुरे गुरुजी, श्री तुळजाभवानी साखर कारखान्‍याचे चेअरमन नरेंद्र बोरगांवकर हे होते तर हिरेमठ संस्‍थानचे बसवेश्‍वर महास्‍वामीजी, कॉंग्रेसचे उस्‍मानाबाद जिल्‍हाध्‍यक्ष आप्‍पासाहेब पाटील, नगराध्‍यक्ष शब्‍बीरअली सावकार, उपनगराध्‍यक्षा सौ. अपर्णा बेडगे, महादेवाप्‍पा आलुरे, नगरसेवक नितीन कासार, कमलाकर चव्‍हाण, शहबाज काझी, नय्यर जहागिरदार, अमृत पुदाले, दयानंद बनसोडे, नगरसेविका निर्मला गायकवाड, कुशावर्ती शिरगुरे, मंगल सुरवसे, स्रपिया पुराणिक, लक्ष्‍मी खारवे, सुमन जाधव, कॉंग्रेस शहर युवक अध्‍यक्ष बसवराज धरणे, श्री कुलस्‍वामिनी सहकारी सुत गिरणीचे अध्‍यक्ष अशोक मगर, उपजिल्‍हाधिकारी प्रशांत सुर्यवंशी, तहसिलदार गायकवाड, अंबाबाई देवस्‍थान ट्रस्‍टचे अध्‍यक्ष रमेश जाधव, उपाध्‍यक्ष सरदारसिंग ठाकूर, अंबाबाई देवस्‍थान जिर्णोध्‍दार समितीचे अध्‍यक्ष शरद बागल, प्रा. जावेद काझी यांची प्रमुख उ‍पस्थिती होती.
    यावेळी बोलताना ना. चव्‍हाण पुढे म्‍हणाले की, नळदुर्ग शहराच्‍या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. भविष्‍यात हे शहर पाण्‍याचे बेट म्‍हणून उदयास येईल. त्‍याकरीता वेगवेगळे प्रकल्‍प हाती घेतले असून रामतीर्थ येथील बंधारा त्‍यापैकी एक आहे. या प्रकल्‍पाचे काम प्रगतीपथावर असून विविध योजनेंतर्गत निधी उपलब्‍ध करुन दिले असून दर्जेदार काम व ठरवून दिलेल्‍या वेळेत हे काम स्‍थानिक लोक प्रतिनिधींनी पूर्ण करुन घेण्‍याचे सांगून या ठिकाणी उभारण्‍यात येणारा कम्‍युनिटी हॉल दोन हजार पेक्षा अधिक लोक‍बसतील एवढा मोठा असून वर्षभरात या हॉलचे उदघाटन होईल. घरकुलच्‍या बाबतीत बोलताना ते म्‍हणाले की, घरकुल ज्‍या व्‍यक्‍तीच्‍या नावे आहे त्‍यालाच मिळवून देणे गरजेचे आहे. शहराला अतिक्रमणाचा विळखा असून नगरपालिकेने अतिक्रमण दूर करावे, त्‍याशिवाय शहराचा विकास होणार नाही, असेही शेवटी त्‍यांनी सांगितले.
    कार्यक्रमाच्‍या सुरुवातीस अंबाबाई मंदीर येथे कम्‍युनिटी हॉल बांधकामाचे भूमीपूजन ना. चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते झाले. कार्यक्रमाचे अध्‍यक्ष माजी आ. आलुरे गुरुजी यांच्‍या हस्‍ते अंबाबाई मंदिराजवळील घाटाचे लोकार्पण ना. चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते फित कापून करण्‍यात आले.
यावेळी माजी आमदार बोरगांवकर म्‍हणाले की, सुमारे 67 लाख रुपये खर्चुन बांधण्‍यात येणारा पाच हजार चौरस फुटाचा कम्‍युनिटी हॉल सर्व समाजातील नागरिकांना लग्‍न कार्य व इतर सांस्‍कृतीक, सामाजिक कार्यासाठी उपयोगी ठरणार आहे. तुळजापूर तालुक्‍यात शैक्षणिक संस्‍था स्‍थापन करण्‍यासाठी सन 1972 साली अंबाबाई मंदीर ट्रस्‍टने पन्‍नास हजार रुपयेची मदत दिली होती. म्‍हणून आज बालाघाट शिक्षण संस्‍था दिमाखात उभी आहे. या संस्‍थेतून मोठ्याप्रमाणावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
     याप्रसंगी माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी बसवेश्‍वर महास्‍वामीजी यांच्‍यासह अनेकांनी आपले विचार व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक शहबाज काझी, सूत्रसंचालन विनायक अहंकारी यांनी केले तर आभार नगरसेवक सचिन डुकरे यांनी मानले.
 
Top