उस्मानाबाद :- महाराष्ट्र राज्य  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेमार्फत फेब्रु./ मार्च-2014 मध्ये घेण्यात येणा-या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी परीक्षेस नियमित पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीनुसार योजनेअंतर्गत्‍तसेच तुरळक विषयक घेवून प्रविष्‍ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा खालीलप्रमाणे जाहिर करण्यात आल्या आहेत. विलंब शुल्कासह आवेदनपत्र सादर करण्याचा कालावधी दि. 7 ते 12  डिसेंबर असल्याचे सचिव, राज्य मंडळ,पुणे यांनी कळविले आहे.
          सदर परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र भरण्यासाठी शाळा /कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा. सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक व प्राचार्यांनी ऑनलाईनवर www.mahahsscboard.maharashtra.gtov.in  www.mahahsscboard.in  वर भरावी.
 
Top