उस्मानाबाद :- जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक 30 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या दिवशी सकाळी 11 वाजता जनतेच्या तक्रारी किंवा अभिकथने पुराव्यासह ऐकुण घेण्यात येईल. तरी सर्व कार्यालय प्रमुख /अशासकीय सदस्य व जनतेनी याची नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती,उस्मानाबाद यांनी  कळविले आहे.
 
Top