सोलापूर -: खासदार निधीतून निकषाप्रमाणे 20 टक्के मागासवर्गीयासाठी (एस.सी/ एस.टी.) कामे करताना ब-याच ठिकाणी जागा मिळण्यासाठी अडचणी येतात अशा ठिकाणी संबंधित अधिका-यांनी बैठक घेऊन जागा उपलब्धतेसाठी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी दिले.
येथील शासकीय विश्रामगृहात खासदार विकास निधीबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना गृहमंत्री शिंदे म्हणाले की, पूर्वी मंजूर असलेल्या कामांना दर वाढल्यामुळे प्रतिसाद मिळत नसेल, यासाठी नवीन अंदाजपत्रक करणे आवश्यक असल्यास तसे कळवावे त्याप्रमाणे वाढीव अंदाजपत्रकांसाठी पत्र दिले जाईल. परंतू अपूर्ण व प्रगतीपथावरील कामे गतीमानतेने पूर्ण करुन मंजूर कामे लवकर सुरु करण्याच्या सूचना गृहमंत्री श्री. शिंदे यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.
या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी 2009-10 पासून 2013-14 पर्यंतच्या खासदार निधीसाठीचा प्राप्त प्रस्ताव, अंदाजपत्रके तयार करण्यासाठी पाठविण्यात आलेले प्रस्ताव, त्यापैकी किती अंदाजपत्रके प्राप्त झाली, प्रगतीपथावर कामे किती, प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली कामे, अपूर्ण कामे, अद्याप सुरु न झालेली कामे याबाबतची विभागनिहाय कामाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
यानुसार गृहमंत्री शिंदे यांनी सविस्तर आढावा घेतला. यामध्ये सुरु न झालेल्या कामाबद्दल माहिती जाणून घेतली. यासाठी जागा न मिळाल्यामूळे किंवा जागेची अपूर्ण कागदपत्रे अथवा तांत्रिक अडचण व अन्य कारणास्तव कामे बदलणे आवश्यक असल्याबाबतच्या अडचणी जाणून घेवून आवश्यक कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शन केले.
या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत म्हेत्रे, विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.