सोलापूर -: मौजे हन्नुर ता. अक्कलकोट येथील गावठाण मोजणी कामाचा शुभारंभ दि. 18 डिसेंबर 2013 रोजी सकाळी 9.00 वा. बाळासाहेब वानखेडे, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, सोलापूर यांच्या शुभहस्ते व विमल विलास गव्हाणे,सभापती अक्कलकोट यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सदर गावठाण मोजणीमध्ये ग्रामस्थांच्या गावठाण हद्दीतील जमिनीची सविसतर मोजणी होवून नकाशे (सनद) व मिळकतपत्रिका हे हक्काचे कागदपत्र तयार होणार आहेत.
तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित रहावे. असे आवाहन उप अधिक्षक भूमि अभिलेख, उत्तर सोलापूर यांनी केले आहे.
तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित रहावे. असे आवाहन उप अधिक्षक भूमि अभिलेख, उत्तर सोलापूर यांनी केले आहे.