सोलापूर -: आत्मा आणि सिध्देश्वर कृषी प्रदर्शन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 16 ते 20 जानेवारी 2014 या कालावधीत कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आत्माचे प्रकल्प उपसंचालक व्ही. एस. बरबडे यांनी कृषी प्रदर्शन नियोजनाच्या बैठकीत दिली.
या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवाडी, सिध्देश्वर देवस्थान समितीचे एम. बी. चाकोते, एस.बी. थोबडे उपस्थित होते.
या कृषी प्रदर्शनात दि. 17, 18 , 19 व 20 जानेवारी 2014 रोजी द्राक्ष, ऊस, डाळींब आणि उन्हाळी भूईमुग या विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे जिल्ह्यातील विक्रमी उत्पादन घेतलेल्या शेतक-यांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच कृषी उद्योग क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणा-या शेतक-यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री. बरबडे यांनी दिली.
या प्रदर्शनात एकूण 100 स्टॉलची उभारणी करण्यात आली असून शेतक-यांना शेती संलग्न विविध विभागांच्या योजनांची आणि तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे श्री. चाकोते यांनी सांगितले.
बैठकीस कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा अग्रणी बँक, डाळींब संशोधन केंद्र, कृषी संशोधन केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र आणि सिध्देश्वर साखर कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.