सोलापूर  -: 24 डिसेंबर रोजी होणा-या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त रंगभवन येथे प्रदर्शन भरविण्यात येणार असून त्याचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांच्याहस्ते करण्यात येईल. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या नियोजन बैठकीत दिली.
    या बैठकीस अन्न धान्य वितरण अधिकारी दिनेश भालेदार, आर.टी.ओ. चे श्री. पवार, बी.एस.एन.एल. चे श्री. जोशी उपस्थित होते.
    ग्राहकांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी आणि जबाबदा-यांविषयी जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात येते. या निमित्त 24 डिसेंबर रोजी रंगभवन येथील हॉलमध्ये विविध विभागांच्या योजना व माहिती विषयक गोष्टींचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. तसेच सोलापूर ग्राहकमंच अध्यक्ष दिनेश महाजन, ग्राहक पंचायतच्या शोभना सागर आणि प्रभाकर कुलकर्णी यांची व्याख्याने आयोजित करण्यात येणार असल्याचेही श्री. चव्हाण म्हणाले.
     या नियोजन बैठकीस अन्न व औषध प्रशासन, वजन मापे, वाहतुक शाखा, एस.टी.महामंडळ विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 
Top