ताज्या घडामोडी

व्‍यंकटरावकाका नळदुर्गकर
नळदुर्ग -: उस्मानाबाद जिल्हयाचे पहिले खासदार तथा नळदुर्गचे सुपुत्र व्यंकटराव काका नळदुर्गकर यांच्या स्मृती दिनानिमित्त सोमवार दि. 16 डिसेंबर रोजी ‘आमचा इतिहास, आमचा अभिमान’ यांतर्गत नळदुर्ग शहरातील पन्नास वर्षात झालेल्या सर्व राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक क्षेत्रातील दिग्गजांच्या इतिहासाचं प्रदर्शन शहरातील मल्लिकार्जून सभागृहात भरविण्यात येत आहे. सायंकाळी सात वाजता भवानी चौक येथे व्यंकटराव काका यांच्या पुण्यतिथीचे कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती पत्रकाद्वारे शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष विनायक अहंकारी यांनी दिली.
   नळदुर्ग शहराचा इतिहास, परंपरा, संस्कृतीला खुप मोठा इतिहास आहे. बालाघाट डोंगराच्या कुशीत व दिमाखात उभा असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याच्या साक्षीने वसलेले व सर्वांना अभिमान वाटावे असे नळदुर्ग शहर आहे.   अलीकडच्या काळामध्ये एका वेगळ्या नळदुर्गचं रूप पाहतोय, जो विचित्र बनत चाललयं, दिशाहीन होत चाललयं, याचं मुख्य कारण म्हणजे लोकांनी विसरलेला इतिहास मागे टाकत चालले आहे. आपली संस्कृती आणि परंपरा युवा पिढीला इतिहास म्हणावा तितका माहित नाही अथवा तो त्यांच्या समोर आलाच नाही. म्हणून “ आमचा इतिहास आमचा अभिमान ”  यांतर्गत गत काळातील स्मृती जागा करण्यासाठी दि. 16 डिसेंबरला उस्मानाबाद जिल्ह्याचे पहिले खासदार कै. व्यंकटरावकाका नळदुर्गकर यांच्या पुण्यथिती निमित्त नळदुर्ग शहराचा इतिहास, या शहरासाठी बलीदान केलेले स्वातंत्र्य सैनिक त्याचबरोबर परंपरा जपणारे कलाकार यांचा पूर्व इतिहास आजच्या पिढीला कळावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शहर व परिसरातील नागरिकांनी तन, मन, धनाने सहकार्य करण्याचे आवाहन संयोजक विनायक अहंकारी यांनी केले आहे.
 
Top