नळदुर्ग :-  ऑल इंडिया मजलीस – ए – इत्तेहादूल मुस्लिमीन पक्ष (एम आय एम) हा राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदोद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली सर्व जाती धर्मातील सर्वसामान्य माणसाला सोबत घेवून त्यांच्या अडीअडचणी सोडविणारा पक्ष असल्याचे मत एमआयएम पक्षाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष समीर सय्यद यांनी नळदुर्ग येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकित बोलताना व्यक्त केले. केले.
    नळदुर्ग येथे सोमवार रोजी ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादूल मुस्लिमिन पक्षाचे (एम आय एम) जिल्हाध्यक्ष समीर सय्यद यांच्या हस्ते नळदुर्ग शहरातील मुलतान गल्ली, इंदिरा नगर, नानीमा परिसर, बसस्थानक परिसर आदी चार ठिकाणाच्या शाखेची बांधणी करून चारही शाखेचे अध्यक्ष व पदाधिकारींची निवड करण्यात आली. ते पुढीलप्रमाणे आहे.  मुलतान गल्ली शाखाध्यक्षपदी काशीम शेख, बसस्थानक परिसर शाखाध्यक्ष शफीक बागवान, नानीमा दर्गाह परिसर शाखाध्यक्ष गुलाम शेख, इंदिरानगर शाखाध्यक्ष समीर शेख आदींजण आहे. यावेळी नळदुर्ग शहराध्यक्ष रजाक कुरेशी, मोसिन शेख, अकबर पठाण, निजाम काझी, यासिन शेख, युशूफ शेख, जाफर बागवान यांच्यासह सह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top