नळदुर्ग -: येथील नगरपालिकेचे नगराध्‍यक्ष शब्‍बीरअली सय्यद सावकार (कॉंग्रेस) यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा जिल्‍ह‍ाधिका-यांकडे  दिला आहे.
    नळदुर्ग नगरपालिकेमध्‍ये कॉंग्रेसची सत्‍ता आहे. पहिल्‍या अडीच वर्षासाठी नितीन कासार, शब्‍बीरअली सावकार व शहबाज काझी यांना प्रत्‍येकी दहा महिन्‍यांसाठी नगराध्‍यक्ष करण्‍याचे पक्षश्रेष्‍ठींसमोर ठरले होते. त्‍यानुसार पहिल्‍या दहा महिन्‍यांसाठी नितीन कासार, त्‍यानंतर शब्‍बीरअली सावकार यांना संधी मिळाली. ठरलेल्‍या कालावधीनुसार शब्‍बीरअली सावकार यांचा नगराध्‍यक्ष पदाचा कालावधी संपल्‍यानंतर पक्षश्रेष्‍ठींच्‍या आदेशानुसार सोमवार दि. 9 डिसेंबर रोजी शब्‍बीरअली सावकार यांनी जिल्‍हाधिका-यांकडे आपल्‍या पदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच जिल्‍हाधिकारी नगरपालिकेच्‍या अध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील. त्‍यानंतर शहबाज काझी यांची नगराध्‍यक्षपदी निवड होईल, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली जात आहे.
 
Top