उस्मानाबाद : महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी पक्षाच्यावतीने रविवार दि. २२ डिसेंबर रोजी मुंबई येथे होणा-या ‘महा गर्जना’ सभेस मराठवाड्यातून सदस्य जाणार असुन मुंबईस जाण्याकरिता मराठवाड्यातून स्वतंत्र ७ विशेष रेल्वे आरक्षित करण्यात आल्याची माहिती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.
मुंबई येथे २२ डिसेंबर रोजी बांद्रा कुर्ला संकुल मैदानावर दुपारी १२ वाजता भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग यांच्या विशेष उपस्थितीत ‘महा गर्जना’ सभेचे आयोजन करण्यात आलेले असुन यावेळी भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, भाजपाचे जेष्ठ नेते व लोकसभेचे उपनेते खा. गोपीनाथ मुंडे, खा. राजीवप्रताप रुडी, भाजपा प्रदेश अध्यक्ष आ. देवेंद्र फडवणीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे,आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
भारतीय जनता पक्षाने केंद्र व राज्य सरकारच्या भ्रष्ट व अकार्यक्षम राजवटीच्या विरोधात रणशिंग फुंकले असुन त्याचा भाग म्हणुन महाराष्ट्र भाजपाने मुंबई येथे महा गर्जना या महासभेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र भाजपाने मराठवाड्यासह राज्यातील ८२ हजार बुथ समितीची रचना पुर्ण केली असुन ‘महा गर्जना’ सभेस राज्यातील सर्व बुथ व गावातून कार्यकर्ते व लोक येणार आहेत. ‘महा गर्जना’ सभा ऐतिहासीक व दिशा देणारी ठरेल. या सभेत मा. नरेंद्र मोदी व मा. राजनाथसिंगजी यांना महाराष्ट्र भाजपाच्यावतीने २५ कोटींचा निधी देण्यात येणार असुन या निधीचे संकलन राज्यभरातून १००, ५००, १०००, ५००० व १० हजार रुपयांच्या कुपन्स स्वरुपात संकलीत करण्यात आला आहे.
मराठवाड्यात लोकसभेचे उपनेते खा. गोपीनाथ मुंडे व प्रदेश अध्यक्ष आ. देवेंद्र फडवणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘महा गर्जने’ च्या पुर्व तयारीसाठी औरंगाबाद येथे जिल्हा श बैठका व विभागीय मेळावा घेण्यात आला. लोकसभेचे उपनेते खा. गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पदाधिका-यांची मराठवाडार जिल्हा व तालुक्यात संमलने, बैठका व बुथ मेळावे करुन ‘महा गर्जना’ सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहाता यावे यासाठी राज्यातील विविध भागातून विशेष रेल्वे आरक्षीत करण्यात आल्या आहेत. तर मराठवाड्यातून औरंगाबाद, जालना, नांदेड, परळी, लातूर, उदगीर व उस्मानाबाद या रेल्वे स्थानकावरुन स्वतंत्र ७ विशेष आरक्षीत रेल्वे निघणार आहेत. मराठवाड्यातून ७ विशेष रेल्वे व अन्य वाहनाद्वारे ७५ हजाराहून अधिक संख्या जाईल याचे नियोजन करण्यात आले आहे.