पांगरी (गणेश गोडसे) : अनेक प्रश्‍न, समस्या, आश्‍वासनांची खैरात तशीच पाठिमागे ठेवत सरते वर्षे सरत चालले आहे. 1972 च्या भीषण दुष्काळाची किंबहुना त्याहीपेक्षा भयावह परिस्थितीचा सामना गतवर्षी शेतक-यांसह सर्वसामान्य नागरिकांना करावा लागला असुन पुणे-लातुर राज्य मार्गाचे रूंदीकरण, विकास कामांचा कांमांचा अडकलेला रथ, सर्वसामान्यांच्या समाधानासाठी व नेत्यांनी त्यांच्या मनोरंजनासाठी केलेल्या फुसक्या घोषणा, रोजगाराच्या शोधात भटकत असलेला व दिशाहीन होत असलेला तरूण यासह अनेक प्रश्‍न तसेच मागे ठेऊन 2013 हे वर्षे जनतेला हुल देऊन गुड बाय म्हणत आहे.
      पांगरी (ता. बार्शी) या भागाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय ठरणारा टेंभुर्णी ते येडशी या 90 किलो मीटर अंतराच्या रूंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ दिवाळीत होणार अशी स्थिती असतानाही डिसेंबर उलटुन जाऊ लागला असला तरीही अद्याप अजुन शुभारंभाचा श्रीफळ वाढवलेला दिसत नाही. रस्ता रूंदीकरणानंतर या मार्गावरील अनेक सुशिक्षित तरूणांना विविध माध्यमातुन रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होऊन अनेकांचा रोजीरोटीचा प्रश्‍न मिटणार आहे. अनेक शेतकरी, प्लॉट मालक धी एकदाचे काम सुरू होऊन रस्ता कुठपर्यंत येईल याच्या विवंचनेत आहेत. रस्ता पुर्ण झाल्यांनतर बांधकामाचे बघु असे म्हणुन अनेकांनी आपली राज्यमार्गालगतची बांधकामेच थांबवलेली आहेत. मात्र पाच सहा वर्षांपासुन प्रलंबित असलेला रूंदीकरणाचा प्रश्‍न आणखी किती दिवस रखडणार असा सवाल विचारला जात आहे. या मार्गाचे बि.ओ.टी तत्वावर निविदा प्रसिध्‍द होऊन पुण्यातील एका कंपनीने टेंडर घेतले असुन अनेक महिन्यांपासुन कंपनीकडुन फक्त मोजण्‍याच चालु असल्याचे दिसत आहे. रस्ते चौपदरीकरणाचा प्रश्‍न मार्गी लागल्यास दळणवळण वाढुन या मार्गावर होणा-या अपघातांच्या संख्येत मोठी घट होणार आहे.
    गत तीन वर्षे दुष्काळात होरपळलेला शेतकरी कसाबसा सावरण्‍याचा प्रयत्‍न करत असतानाच या भागातील शेतक-यांच्या मानगुटीवर पवनउर्जा प्रकल्पाचे कधीच न उतरणारे भुत बसु पहात आहे. शेतीच्या माध्यमातुन अल्पशा पावसाच्या पाण्यावर उदरनिर्वाह करणारा या पटयातील शेतकरी या येत असलेल्या संकटामुळे खुपच भयभित झाला. असुन पुढे काय करायचे हा मोठा प्रश्‍न त्यांच्यासमोर आ वासुन उभा आहे. गतवर्षी द्राक्षबागांना छाटनीच्या वेळेस पाणी मिळु शकले नाही. त्यामुळे या भागातील जवळपास ऐंशी टक्के द्राक्ष बागांना यावर्षी मालच लागलेला नाही. उलट शेतकरी या बागा जगवण्‍यासाठीच कसरत करताना दिसत आहे. शासनाने या परिस्थतीकडे साधे ढुंकुनही बघण्‍याचे औदार्य दाखवलेले नाही. तरीही शेतकरी असो असे म्हणत बागां टिकवण्‍यासाठी धडपडत आहेत.
  कांदा कधी शेतक-यांच्या चेह-यांवर हासु आणतोय तर कधी ग्राहकाला रडवतोय. कांदाच्या दरातील चढउतार कांदा उत्पादक शेतक-यांच्या जिवावर बेतत आहे. कांदयाच्या दरातील चढउतारामुळे कांही कांदा उत्पादक शेतक-यांनी आत्महत्या केल्याच्या घटना ताज्या आहेत. त्यामुळे अशा घटना टाळण्‍यासाठी हमीभाव देणे गरजेचे आहे.
   पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने गत वर्षे बिगर ताणतणावाचेच गेले आहे. कारण सरत्या वर्षात हद्दीत कोणती स्फोटक अथवा प्रशासनावर ताण आनणारी एकही घटना घडलेली नाही. प्रशासनाने परिस्थती हाताळत शांतता ठेवण्‍याचे काम केले आहे. एकंदर सरते वर्षे हे सर्वसामान्यांसह शेतकरी कष्‍टकरी यांच्यासाठी कांही अपवादात्मक गोष्‍टी वगळता त्रासदायकच गेले असुन आगामी वर्षे तरी कसे सुरू होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
 
Top