कसं कळेना तुला, 
माझ्या या भावना,
एकदा तरी जाण ना, 
माझ्या या वेदना...
हवेच्या लहरीतुनं, शब्द हे वाहत...
अनं तुझ्या प्रेमात, 
हा जीव प्रेम गीत गात..
कसं कळेना तुला...!!
नाही राहिलो, आता माझ्यात मी,
झालो मी तुझा प्रेमवेडा..
पाहताचं तु मला, मनी झंकारते ,
प्रेमाचा वर्षाव सडा..
कसं कळेना तुला....!!
गंध हा प्रेमाचा, मनी माझ्या साठवत,
अणं तुझे ते गोड क्षण, मनी माझ्या आठवत.
का कळेना तुला...!!
 
                                                                             :- स्वप्नील चटगे

 
Top