बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी महावितरण कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा आल्यानंतर भिंतीला मोठ्या प्रतीमध्ये बातम्यांचे कात्रण चिटकवल्याचे व त्यावर अजित पवारांच्या आदेशाचे वर्णन पाहून जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे यांनी ते तात्काळ फाडण्याचे आदेश दिले. यावेळी बोलतांना ठोंगे-पाटील म्हणाले, अशा प्रकारच्या धोरणांमुळेच शेतकर्यांची आत्महत्या होत आहे. आज केलेले आंदोलन हे शांत होते परंतु येत्या गुरुवारपर्यंत महावितरणच्या भूमिकेत बदल न झाल्यास ठिय्या आंदोलन केले जाईल, प्रसंगी परिस्थिती हाताबाहेर गेल्यास त्याला अधिकारी हेच जबाबदार असतील.
महावितरणच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात सर्व ठिकाणी आंदोलने करण्यात आली. बार्शीमध्ये निषेधाच्या काळ्या फिती गळ्यात अडकवून तिरडी आंदोलनाचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शासन व विद्युत विभागाच्या प्रतिकात्मक पुतळ्यास शिवसैनिकांनी खांदा दिला. एका छोट्या टेंपोमध्ये मोर्चासाठी दोन गाढवं आणली होती परंतु त्याच्यावर नाव टाकण्यासाठी वेळेवर खडू मिळाला नसल्याने पोस्ट ऑफिस चौकातच झेंड्याच्या खांबाला गाढवं बांधून मोर्चा पुढे निघाला. नियोजनाअभावी अथवा आयत्या वेळीचे नियोजनातील बदल म्हणून गाढवं तेथेच विसरली. शनिवारचा दिवस हा बार्शीतील बाजाराचा दिवस आहे. ग्रामीण भागातील लोक बार्शी शहरात मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे गर्दीचे स्वरुप प्राप्त होते याच दिवशी शिवसेनेच्या वतीने केलेल्या मोर्चामुळे रस्त्यातील वाहतुक काही काळ खोळंबली होती. जिल्ह्यात दोन ठिकाणी पुतळ्याचे अनावरण व मंत्र्यांची रेलचेल असल्याने पोलिस प्रशासनावर त्या ठिकाणी बंदोबस्त लावण्याचीही धावपळ सुरु होती.
दुष्काळाची परिस्थिती असतांना शेतकर्यांनी वीजेचा वापर न करताही मोठ्या प्रमाणात विजेच्या बीलांची मागणी करण्यात येत आहे. तसेच दंडेलशाही करत वसूलीचा तगादा लावण्यात येत आहे. वीज बिलांची थकीत येणी वसूली संदर्भात महावितरणकडून शेतकर्यांच्या विजेचे कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावल्याने सदरच्या कारवाईचा निषेध करण्यात आला. बार्शी शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने पोस्ट ऑफिस चौकापासून तहसिल व महावितरणच्या कार्यालयावर तिरडी आंदोलनाचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख अस्मिता गायकवाड, तालुक्याचे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, बाबासाहेब कापसे, तालुका प्रमुख काकासाहेब गायकवाड, महिला आघाडी प्रमुख मंगलताई पाटील, राजेंद्र मिरगणे, शहर प्रमुख दिपक आंधळकर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरुन बार्शी तहसिल कार्यालयात आला. यावेळी तहसिलदार बालाजी सोङ्कवंशी यांना निवेदन देण्यात आले व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी तहसिलदारांशी चर्चा करत माहिती सांगीतली. यावेळी सोमवंशी यांनी लवकरच महावितरणच्या कर्मचार्यांना व शिवसेनेच्या पदाधिकार्यांची संयुक्त बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले. तेथून हा मोर्चा शहरातील महावितरणच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे नेण्यात आला या ठिकाणी अभियंता कोंडगुळे यांनी निवेदन स्विकारले. तेथून बस स्थानक चौकातील मुख्य कार्यालयात मोर्चा वळविण्यात आला. या ठिकाणी जिल्हाप्रमुख लक्ष्ङ्कीकांत ठोंगे-पाटील, अस्मिताताई गायकवाड, भाऊसाहेब आंधळकर, राजेंद्र मिरगणे यांनी समायोचित विचार मांडले. काका गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांनी सदरच्या मोर्चात कडक बंदोबस्त ठेवला.