विद्याताई वाघ
उमरगा (लक्ष्‍मण पवार) :- शहरातील महिला राजसत्‍ता आंदोलन समितीच्‍या राज्‍याध्‍यक्षा सौ. विद्याताई भुमीपुत्र वाघ यांना ''भिमाई गौरव'' पुरस्‍कार नुकताच जाहीर झाला आहे.
    दि. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्‍मृतीचे दहन केले, त्‍यास 86 वर्षे पुर्ण होत आहेत. ख-या अर्थाने हाच दिवस स्‍त्रीमुक्‍ती दिन म्‍हणून साजरा होणे गरजेचे आहे. म्‍हणून यावर्षी बुधवार दि. 25 डिसेंबर रोजी महाराष्‍ट्र लोकशाही आघाडीच्‍यावतीने 86 कर्तत्‍ववान स्‍त्रीयांना सन्‍मानचिन्‍ह देऊन गौरविण्‍यात येणार आहे. हा कार्यक्रम उस्‍मानाबाद येथील यशराज लॉन्‍स येथे संपन्‍न होणार असल्‍याचे संयोजक मिलींद रोकडे यांनी प्रसिध्‍दीपत्रकाद्वारे कळविले आहे. सौ. विद्याताई वाघ यांना भिमाई गौरव पुरस्‍कार जाहीर झाल्‍याबद्दल सर्वत्र त्‍यांचे अभिनंदन होत आहे.
 
Top