उमरगा (लक्ष्‍मण पवार) -: उमरगा-लोहारा शिवसेनेच्‍यावतीने सोमवार दि. 23 डिसेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्‍यात येणार आहे. यात दोन्‍ही तालुक्‍यातील शेतक-यांच्‍या कृषीपंप व पाणी पुरवठ्याचे वीज जोडणी तोडण्‍यात आलेली आहे. ते पूर्ववत जोडणी होईपर्यंत आमदार ज्ञानराज चौगुले समवेत दोन्‍ही तालुक्‍यातील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक, शेतकरी तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित राहावेत, असे आवाहन उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, लोहारा तालुकाप्रमुख मोहन पणुरे यांनी प्रसिध्‍दीपत्रकाद्वारे केली आहे.
 
Top