कळंब (बालाजी जाधव) : कळंब तालुका ज्‍येष्‍ठ नागरीक संघाचा भव्‍य मेळावा रविवार दि. २९ डिसेंबर रोजी आयोजित करण्‍यात आला आहे. मेळाव्‍याच्‍या तयारीसाठी नुकतीच श्री संत ज्ञानेश्‍वर माऊली बालकाश्रम परिसर येथे बैठक घेण्‍यात आली. बैठकीत संघाचे तालुकाध्‍यक्ष महादेव महाराज अडसुळ यांनी संघाच्‍या कार्यक्रमाविषयी व महाराष्‍ट्र शासनाने ज्‍येष्‍ठ नागरीक धोरण जाहीर केल्‍यासंबंधी आपले विचार व्‍यक्‍त केले.
    या धोरणानुसार प्रत्‍येक ज्‍येष्‍ठांना प्रतिमहा एक हजार रुपये, वृध्‍दपकाल पेन्‍शन, ज्‍येष्‍ठांसाठी विरगुंळा केंद्र, वृध्‍दाश्रम, स्‍मृतीभ्रंश केंद्र स्‍थापन करणे, ज्‍येष्‍ठांचा विविध स्‍तरातुन होणारा छळ, पिळवणूक यापासून त्‍यांचे संरक्षण करणे, यासह ज्‍येष्‍ठ नागरीक धोरणाच्‍या मसुद्यातील सविस्‍तर माहिती प्रत्‍येक ज्‍येष्‍ठांना मिळावी, म्‍हणून रविवार दि. 29 डिसेंबर रोजी ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी भव्‍य मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्‍यात आला आहे. या मेळाव्‍यासाठी उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण, खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार ओमराजे निंबाळकर, जि.प. अध्‍यक्ष डॉ. सुभाष व्‍हट्टे, डॉ. बी.आर. पाटील (लातूर-मुंबई), आचार्य सुभाषचंद्र (येडशी), डॉ. मुंकुंद जोशी यांचे मार्गदर्शन होणार आहेत.
    या बैठकीसात अॅड. त्र्यंबक मनगिरे, डॉ. माणिकराव डिकले, डी.के. कुलकर्णी, भिमराव पांचाळ, शाहीर राणा जोगदंड, महादेव महाजन, माधवसिंग राजपूत, बापू मिटकरी, अच्‍युतराव माने यांनी आपले विचार व्‍यक्‍त केले. यावेळी शकुंतला गायकवाड, राजश्री शिनगारे यांच्‍यासह तालुक्‍यातील तीस गावचे ज्‍येष्‍ठ नागरीक, संघ प्रतिनिधी उपस्थित होते.
 
Top