सोलापूर -: केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे.
    रविवार दि. २२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता पुणे येथून खाजगी हेलिकॉप्टरने भिमा सहकारी साखर कारखाना, टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथे आगमन. दुपारी ३ ते ४.१५ वाजता कै.श्री. भिमराव महाडीक यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ - भिमा सहकारी साखर कारखाना, टाकळी सिकंदर ता. मोहोळ) दुपारी ४.१५ वाजता भिमा सहकारी साखर कारखाना, टाकळी सिकंदर ता. मोहोळ येथून खाजगी हेलिकॉप्टरने किंवा शासकीय वाहनाने मंगळवेढाकडे प्रयाण. दुपारी 4.45 वाजता संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा येथे आगमन. दुपारी 4.45 ते 5.45 वाजता  कै. श्री. के.आर. मर्दा आणि कै. श्री. रतनचंद शहा यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमास उपस्थिती.(स्थळ - संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा) सायंकाळी 5.45 वाजता संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा येथून शासकीय वाहनाने सरकोली ता.पंढरपूरकडे प्रयाण. सायंकाळी 6 ते 7 वाजता सरकोली ता. पंढरपूर येथे आगमन व आ. भारत भालके यांचे निवासस्थानी राखीव. सायंकाळी 7 वाजता सरकोली ता. पंढरपूर येथून शासकीय वाहनाने बारामती जि. पुणेकडे प्रयाण.
 
Top