बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील बार्शी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी विजय निलाखे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
     
   बार्शी प्रेस क्लबचे मावळते अध्यक्ष सचिन वायकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शासकिय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. याच बैठकित सचिवपदी मल्लिकार्जुन धारुरकर, उपाध्यक्षपदी सचिन अपसिंगकर, प्रशांत घोडके, सहसचिव गणेश भोळे, खजिनदार संजय बारबोले यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
     निवडीनंतर बोलतांना नूतन अध्यक्ष निलाखे यांनी आगामी वर्षभरात राबविण्यात येणार्‍या उपक्रमांची रुपरेषा सांगितली. सांघीक जबाबदारी तसेच सर्व सदस्यांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र राहण्याची ग्वाही दिली.
     बार्शी प्रेस क्लबचे कार्यकारिणी सदस्य पुढीलप्रमाणे : प्रशांत आवटे, सुदर्शन हांडे, कदिर बागवान, गोरख यादव, मनोज हंप्रस, विनोद ननवरे, नंदराज माढेकर, कायदेविषयक सल्लागार अॅड.प्रशांत शेटे.
    सर्व सदस्यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात तसेच बिनविरोध अध्यक्ष निवडीची परंपरा याही वर्षी कायम राखली. निवडीनंतर बार्शीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नूतन पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या.
 
Top