नळदुर्ग : स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक शुर वीरांनी बलिदान देवून हैद्राबाद संस्थानामधुन मराठवाडा स्वातंत्र्य करण्याच्या कार्यात योगदान दिले. या शूरवीरांचा तरुण पिढीने आदर्श ठेवून राष्ट्रीय एकात्मता साधावी. देशाची एकात्मता टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून कार्य करावे, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुगधविकास, मत्स्य व्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालया हुतात्मा बाबुराव बोरगावकर व हुतात्मा निलय्या स्वामी यांच्या नियोजित स्मारकाचे भुमीपूजन पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सि. ना. आलुरे गुरुजी व नरेंद्र बोरगावकर, बाबुराव स्वामी, नगराध्यक्ष शबीरअली सावकार, नय्यर पाशा जहागीरदार, प्रभाकर नळदुर्गकर आदिंची व्यासपीठावर उपस्थिती होती.
पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, हुतात्म्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अहोरात्र कार्य करुन देशास स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या त्यागातून देश स्वातंत्र्य झाला. त्यांच्या कार्याचा विसर पडता कामा नये. हुतात्मा स्मारकाच्या उभारणीसाठी निधी कमी पडु दिला जाणार नाही.
प्रभाकर नळदुर्गकर (काका) यांनी बालाघाट संस्थेमध्ये स्मारक उभारण्यास जागा उपलब्ध करुन दिली त्याबदृदल आभार व्यक्त केले. नय्यर जहागीरदार ,नरेंद्र बोरगावकर, सुभद्राताई मुळे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात आलुरे गुरुजी यांनी राज्यात हुतात्मा स्मारक उभारण्यासाठी माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी धाडसी निर्णय घेवून राज्यात एकाचवेळी हुतात्म्यांचे स्मारके उभारण्याचे महान कार्य केल्याचा उल्लेख केला.
प्रारंभी हुतात्म्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते यावेळी हुतात्मापुत्र नरेंद्र बोरगांवकर आणि बाबुराव स्वामी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी जवाहर विद्यालय अणदुर येथील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. याप्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुनील चव्हाण, श्री कुलस्वामिनी सुत मिलचे चेअरमन अशोकराव मगर, सदस्य भागवतराव गुंडे, किसन भरंगड, अख्तर काझी, महादेवाप्पा आलुरे, लिंबराज कोरेकर, मुकुंद डोंगरे, संभाजी पाटील बाभळगावकर, डॉ. अभय शहापूरकर, प्रभारी नगराध्यक्षा अपर्णा बेडगे, गटनेते नय्यरपाशा जहागिरदार, रामहरी गोरे, अशोकराव पाटील, दिगंबर खराडे, शहराध्यक्ष शफी शेख, संजय मोरे, पंचायत समिती सदस्य संजय देशमुख, अच्युत माळी, संजय जाधव, जनार्धन होर्टीकर, सुभद्रा मुळे, शहबाज काझी, मुश्ताक कुरेशी, बंकट कदम, गोकुळ शिंदे, बाबुराव सुरवसे, अशोक पुदाले, प्रकाश चौगुले, गणपत नरवडे, प्रदीपराव मंटगे, अधिक्षक धनंजय पाटील, शहाजी पाटील, प्रा. डॉ.जे.एस. मोहिते, प्रा. माकणे, हुतात्मापुत्र बाबुराव स्वामी व त्यांचे कुटुंबीय, हुतात्मा बाबुराव बोरगांवकर यांचे कुटुंबीय सुरेंद्र बोरगांवकर, सौ. कृष्णामाई बोरगावकर, उल्हास बोरगावकर, आदित्य बोरगावकर यांच्यासह नळदुर्ग महाविद्यालयातील प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते. सूत्रसंचलन डॉ. उमाकांत चनशेट्टी व संतोष पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अभय शहापूरकर यांनी केले.