उस्मानाबाद -: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागातील विविध कार्यालयातील रिक्त पदांसंदर्भात दिनांक 10/11 सप्टेंबर 2013 रोजी प्रसिध्दीस देण्यात आलेल्या जाहिरातीतील काही पदांच्या समांतर आरक्षणात बदल झाला आहे.
या बाबतीत संचालक कार्यालयाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की मराठवाडा विभागातील विविध कार्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत सविस्तर जाहिरात प्रसिध्दीस देण्यात आली. सदर जाहिरात दिनांक 10/11 सप्टेंबर रोजी प्रसिध्द झाली. त्यानंतर मुख्यालयाच्या निर्देशानुसार काही रिक्त पदांच्या समांतर आरक्षणात अंशत: बदल झाला असून त्यानुसार काही पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या बाबतीतील तपशिलवार शुध्दीपत्रक विविध वृत्तपत्रातून दिनांक 3 डिसेंबर 2013 रोजी प्रसिध्दीस देण्यात आले आहे.
पदभरतीची मूळ जाहिरात आणि शुध्दीपत्रक मराठवाडा विभागातील सर्व जिल्हा माहिती कार्यालयातून सुचना फलकावर लावण्यात आले आहे. सर्व संबंधितांना ते कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व वेळी पाहता येईल.
सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी आणि शुध्दीपत्रकानुसार आता पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी विहित मुदतीत व विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.