पांगरी (गणेश गोडसे) -: वली सिकंदर शाह कादरी ट्रस्टतर्फे पांगरी (ता. बार्शी) येथे शनिवार दि. 7 डिसेंबरपासुन जलसा अज्मते औलिया या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आल्याची माहिती एका प्रसिध्‍दी पत्रकाद्वारे देण्‍यात आली आहे.
   राष्ट्रीय एकात्मतेचे व मानवतेचे प्रतिक असलेले पांगरी (ता.बार्शी( येथील महान सुफी संत वली सिकंदर शाह कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात शुक्रवार दि. 6 डिसेंबर रोजी सायंकाळी फातेहा हजरते सरकार सय्यद मुहम्मद बादशाह कादरी व सरकार सय्यद इब्राहिम शाह कादरी चिश्ती रह अलै व शनिवारी दि.7 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता जुलुस व महाप्रसादाचे वाटप करण्‍यात येणार आहे. तसेच महाप्रसाद वाटपानंतर रात्री आठ वाजता मान्यवरांचे प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. प्रवचनानंतर रात्री कव्वालीचा सदाबहार कार्यक्रम व महिफिले समाचे आयोजन करण्‍यात आले आहे. पांगरी-झानपुर रस्त्यावरील वली सिकंदर कादरी नगर येथे हे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत.
   सर्व धर्मातील महान विभुतींनी समाजाला मानवता समानता व बंधुभावाची शिकवण देऊन मानवाचे हित व कल्याणच केलेले आहे. तसेच इस्लामिक सुफि संत ख्वाजा गरिब नवाज बाबा फरिद बाबा बंदेनवाज व इतर सुफ संतांनी मानवाला प्रेम व बंधुभावाची व आनंदमय जिवन जगण्‍याची प्रेरणा व महान शिकवण दिलेली आहे. संतांचे आदर्श व अनुकरण राष्ट्रीय एकात्मता व मानव धर्मासाठी पुरक आहे. त्याच पदधतीने प्रत्येकवर्षी पांगरी येथे वली सिकंदर शाह कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टतर्फे अध्यक्ष सत्तार बागवान व रऊफ शेख, शकिल बागवान, नाजिम सौदागर, अमोल कुंभार, अलिम सय्यद, शहाजान आतार, अमजद काझी आदींनी केले आहे.
 
Top