सोलापूर :- शासकीय जाहिरात वितरण धोरण पुनर्विलोकन समिती अंतर्गत जाहिरात मंजुरी, वितरण इत्यादी बाबत निकष संबंधीची उपसमितीची बैठक पुणे येथील विभागीय माहिती कार्यालयात, शनिवार दि. 7 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या दिवशी दुपारी 4 ते 5 या वेळेत संपादक/ पत्रकार संघटनांची निवेदने स्विकारली जाणार आहेत. तरी ज्या संपादक/ पत्रकार संघटनांना जाहिरात मंजुरी, वितरण इत्यादी निकषाबाबत निवेदने द्यावयाची आहेत त्यांनी दिनांक 7 डिसेंबर 2013 रोजी दुपारी 4 ते 5 या वेळेत निवेदने द्यावीत, असे उपसंचालक (माहिती) पुणे तथा उपसामितीचे सदस्य सचिव यांनी कळविले आहे.