उस्मानाबाद :- येथील ब्राह्मण सेवा संघ या सेवाभावी व समाजसेवी संस्थेमार्फत संगीताचे शिक्षण घेणारे विद्यार्थी कु.रेणुका मुकूंद कुलकर्णी व वैष्णवी गणेश कवठाळे (रा.बार्शी) या दोन विद्यार्थीनींना संगीताचे शिक्षण घेण्यास सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने हार्मोनियम पेटीचे वाटप करण्यात आले.
    उस्‍मानाबाद येथील ब्राह्मण सेवा संघ या सेवाभावी व समाजसेवी संस्थेतर्फे यासंदर्भात देणगीदारांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन पुणे येथील योगशिक्षक वसंत देव व सौ.प्रभा व जी.एस.तासगावकर (सेवानिवृत्त प्राचार्य, अभियांत्रिकी महाविद्यालय) यांनी हार्मोनियम पेटी देण्यासाठी देणगी दिली. एका कौटुंबिक समारंभात या हार्मोनियम पेटींचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी समर्थनगर मधील रहिवासी व महिलावर्ग उपस्थित होते.
 
Top