![]() |
कै. सतिश तौर |
पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी (ता. बार्शी) येथील सतिश तौर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त भव्य तालुकास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 20 डिसेंबी रोजी सुरू होणा-या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांसाठी शितल जानराव व विकास राऊत यांच्यावतीने प्रथम अकरा हजार अकरा रूपयांचे शुभाष चांदणे व दतात्रय पोफळे यांच्यातर्फे दिवीतीय 7777 रूपयांचे तर समाधान पोफळे याच्यातर्फे 5555 रूपयांचे तृतीय बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच बाबा जाधव, साई रेडीमेडस यांच्यातफेर्ही स्पर्धेसाठी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
उक्कडगांव रोडवरील महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीच्या प्रांगनावर पार पडणा-या क्रिकेट सामन्यांसाठी उमेश पवार, सुधीर माळी, नेताजी गाढवे, सम्राट तावसकर, धनराज जिम, अमजद शेख, अजित शेख, सनी काकडे, किरण गाढवे यांच्यावतीनेही बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धकांनी उमेश पान स्टॉल, मोहिनी हॉटेल, माऊली पान सेटर व गुरूदत्त ट्रेडर्स येथे आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन संयोजक धनंजय तौर व समाधान पोफळे यांनी केले आहे.