पांगरी (गणेश गोडसे) : न्‍यायालयाच्या निकालाच्या कारणावरूण व पाठीमागील भांडणाचा राग मनात धरूण दोन गटात झालेल्या हाणामारीत दोन महिला जखमी झाल्याची घटना बुधवार दि. 19 डिसेंबर रोजी सकाळी साडे सात वाजण्‍याच्या सुमारास वालवड (ता.बार्शी) येथे घडली.
    स्‍वाती नितीन जाधवर (रा.वालवड, ता.बार्शी) व मनिषा सुनिल ढाकणे (रा.चुंब, ता.बार्शी) अशी मारहाणीत जखमी झालेल्या दोन्ही गटातील जखमींची नांवे आहेत. परस्परविरोधी फिर्यादिवरूण दोन्ही गटांच्या दहा जनांविरूदध मारहान व विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्‍यात आले आहेत.
  जखमी स्वाती नितीन जाधवर (रा.वालवड हल्ली रा.वाणी प्लॉट बार्शी) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, सोलापुर येथील न्यायालयात दाखल असलेल्या दाव्याचा निकाल सोमवार दि.16 डिसेंबर रोजी त्यांच्या बाजुने लागला होता. त्याचा राग मनात धरून आरोपी सोपान भागवत, जाधवर दैवशाला, बाळासाहेब जायभाय, मनिषा सुनिल ढाकणे, तेजश्री सोपान जाधवर, नवनाथ सोपान जाधवर, संजिवनी सोपान जाधवर व पोपट (पुर्ण नांव माहित नाही) या सातजणांनी मिळुन गैरकायदयाची मंडळी जमवुन त्यांच्या शेतात त्यांना शिविगाळ दमदाटी करूण लाथाबुक्यांनी मारहान करूण गंभिर जखमी केले.
   अत्याचरीत महिलेने दिलेल्या विरोधी फिर्यादित म्हटले आहे की, आरोपी नितीन बापु जाधवर, भिवा चांगदेव जाधवर व सुभाष भिवा जाधवर (सर्वजण राहणार वालवड, ता.बार्शी) यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून दारूच्या नशेत फिर्यादिच्या वडीलांच्या शेतात जावुन फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहान करून गळयातील दोन डोरले व 70 सोन्यांचे मनी असा 21 हजार रूपयांचा ऐवज हिसकावुन घेतला.तसेच फिर्यादीस लज्जास्पद वाटेल असे वर्तन करूण तिचा विनयभंग केला. परस्परविरोधी फिर्यादिवरून दोन्ही गटांतील आरोपीविरूध्‍द गुन्हे दाखल करण्‍यात आले आहेत. अद्याप आरोपींना अटक करण्‍यात आली नाही. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top