उस्मानाबाद :- देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडचणी दूर करुन त्यांचे दैनंदिन जीवन सुसहाय व्हावे, युध्दात अपंगप्त झालेल्या आणि निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी, माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदतीसाठी समाजातील सर्व घटकांतील अधिकारी, कर्मचारी, विविध सेवाभावी संघटना सर्वांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांनी केले.
येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ श्री. पाटील यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
पाटील म्हणाले की, आपले सैनिक देशाच्या तसेच पर्यायाने सर्वांच्या संरक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. त्यांचे कार्य लक्षात घेवून समाजाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांनी सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन मोठ्या प्रमाणावर मदत करावे. ध्वजदिन निधीमधून माजी सैनिक, त्यांचे पाल्य व कुटुंबियांना स्वयंरोजगार, शिक्षणासाठी मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडुकर-पाटील म्हणाले की, आपले सैनिक डोळयात तेल घालून देशाचे, सरहदृदीचे संरक्षण करतात. रात्रंदिवस सेवा दिल्यानेच आपण आज निर्धास्तपणे जीवन जगत आहोत. हे विसरता कामा नये. देशात अवेळी उदभवणाऱ्या कायदा व सुव्यवस्था, समस्या, अतिवृष्टी, वादळे किंवा भुकंपासारख्या आपत्तीच्या वेळी नागरीकांच्या मदतीला धावुन जात असल्याने त्यांची अनुलनीय कामगिरी लक्षात घेवून सर्व घटकांनी ध्वजनिधी संकलनात योगदान दयावे, असे प्रतिपादन केले.
यावेळी माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय अवलंबितांना केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनेअंतर्गत एकुण 10 लाख 50 हजाराचे वाटप करण्यात आले. या सैनिकांच्या 42 लाभार्थ्यांना चरितार्थासाठी, 13 सैनिकांच्या मुलींच्या विवाहासाठी, 28 अत्यंविधीसाठी, 01 दिवंगत सैनिकाच्या पत्नीस आर्थीक मदत, 2 वैद्यकिय मदत, 2-परराज्यात शिक्षणासाठी, 48 व्यावसायीक शिक्षण घेण्यासाठी, 2 विर्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी विद्यावेतन, 01 स्वयंरोजगारासाठी , 7 विद्यार्थ्यांना सैनिक शाळेच्या खर्चासाठी, 6 शालेय शिक्षणासाठी, 2 महाविद्यालय शिक्षणासाठी, 09 युध्द विधवांना एस. टी. सवलतीसाठी , 4 विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण व 7 विद्यार्थ्याचे वसतीगृह खर्च भागविण्यासाठी वाटप करण्यात आले.
गतवर्षीच्या ध्वज निधी संकलनात जिल्ह्याने भरीव कामगिरी करुन उद्दिष्ठपूर्ती केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण, गृह, परिवहन महामंडळ, परिवहन विभाग, जिल्हा अधीक्षक कृषि विभाग, महसूल, आरोग्य, नगर परिषद, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा उपनिबंधक, वीज, वन, मत्स्य, आयुर्वेदीक कॉलेज आदि विविध कार्यालयाने ध्वजनिधी संकलनात योगदान दिल्याबदल त्यांचा प्रमुख पाहूण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सासणे यांनी प्रमुख पाहूण्यांचे स्वागत केले करुन आपल्या प्रास्ताविकात यंदा उस्मानाबाद जिल्ह्यास ध्वजनिधी संकलनाचं उद्दिष्ठ 41 लाखाचे दिले असून उदिृष्टपुर्तीसाठी असल्याचे त्यांनी सांगितले. शुरवीर जवांनानी देशाचे संरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहूती दिली अशा वीर माता व पिता यांचा, वीर पत्नीचा गौरव व्हावा, समाजातात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, त्यांच्या कौटुंबिक अडचणी निवारण्यासाठी धवजदिन निधी संकलन करण्यात येत असल्याची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली.
यावेळी जवानाच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून म्हणून सर्वांनी दोन मिनीट स्तब्ध उभे राहून मौन पाळण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. रवि सुरवसे यांनी केले तर आभार हवालदार माधव कानगुले यांनी मानले. समारंभास उपजिल्हाधिकारी व्ही. एम. कोळी, तहसीलदार काकडे, गृह विभागाचे, सैनिक कल्याण कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच माजी सैनिक, त्यांच्या पत्नी, आदि उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.