बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी शहरातून जाणार्या लेंडी नाल्यावर अतिक्रमित तसेच परवान्यापेक्षा जादा बांधकाम करुन शेजारी असलेल्या महालक्ष्मी मंदिरालगत बेकायदा सुरु केलेली वहिवाट बंद करण्याची मागणी हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष अनिल पवार यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
शाहीर अमर शेख चौकात शासकिय जागेतील मशिदिचे बांधकाम मागील अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात सुरु आहे. नगरपालिकेकडे विनंती करुन घेतलेल्या परवान्यापेक्षा जादा बांधकाम तसेच पूर्वी नसलेल्या ठिकाणीही वहिवाटीकरिता दरवाजे काढण्यात आले आहेत. याच्या शेजारी हिंदूंचे दैवत असलेल्या महालक्ष्मीचे पुरातन मंदिर आहे. शेजारी असलेल्या अनाधिकृत टपर्याही पाडून टाकाव्या तसेच मंदिराच्या परिसराची जागा मोकळी ठेवावी अन्यथा या प्रश्नावर जनआंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे. नगरपरिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, नगरविकास मंत्रालय, पालकमंत्री, पोलिस अधिकारी इत्यादींना या निवेदनाच्या प्रति देण्यात आल्या आहेत.