नळदुर्ग -: अणदूर (ता. तुळजापूर) येथील ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रेनिमित्त मंगळवार दि. 3 डिसेंबर रोजी पहाटे पासुन दिवसभर धार्मिक कार्यक्रम, त्यानंतर रात्री 12 वाजता नळदुर्गचे मानकरी मिरवणुकीने ‘श्री’ ची मुख्यमुर्ती श्रीक्षेत्र मैलारपुरकडे (नळदुर्ग) घेऊन जाण्यासाठी मान्यवराचे आगमन होईल. दुस-यादिवशी बुधवार रोजी अणदुर येथे यात्रा कमेटी व ग्रामस्थांच्या वतीने जंगी कुस्त्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील खंडोबाची यात्रा मंगळवारी होवुन दुस-यादिवशी म्हणजे बुधवारी पहाटे देवाची मुख्यमुर्ती पावणे दोन महिन्यासाठी श्री क्षेत्र मैलारपुर नळदुर्ग येथे चंपाषष्ठीच्या उत्सवासाठी स्थलांतर होत असुन अशी प्रथा महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे. मार्गशिर्ष प्रतिपदा ते पौष पौर्णिमेनंतर आष्टमीपर्यंत श्री ची मुर्ती नळदुर्ग शहराच्या उत्तरेकडे असलेल्या बोरी नदीच्या काठावरील मैलारपुर येथे वास्तव्यास असते. मंगळवार रोजी पहाटे 4 वाजता काकड आरती, भक्तगण पहाटेपासून दंडवत घालून आपला नवस पूर्ण करण्यासाठी मोठी गर्दी करतात. सकाळी 9.30 वाजता श्रीच्या महापुजेस सुरूवात होणार आहे. अभ्यंगस्नान व अभिषेक करून षोडोपचारे महापुजा होते दिवसभर भक्तगण दर्शनासाठी येतात, तळी भंडार उचलने, ओटी भरणे, भंडारा खोबरे उधळणे, जावळ काढणे, लंगर तोडणे असे विविध कार्यक्रम भाविक भक्त मोठया श्रध्देने करुन आपला नवस पुर्ण करतात. मानाची काठी, वाघ्याची मुरळी नृत्य, धनगरी ओव्या इत्यादीच्या तालावर बेभान होऊन नाचतात व रात्री 10 वाजता श्री चा अश्वरुपी छबीना सवाद्य मिरवणुकीने काढण्यात येणार आहे. रात्री 12 वाजता नळदुर्गचे मानकरी मिरवणुकीने श्री ची मुख्यमुर्ती मैलारपुर नळदुर्ग घेऊन जाण्यासाठी येतात. त्यांचे स्वागत अणदूरचे मानकरी यात्रा कमिटी व देवस्थान कमिटी करतात. पहाटे दोन वाजता श्रीच्या साक्षीने अणदुर व नळदुर्गच्या मानकर्यांचा मानपान सोहळा व महाआरती होवुन त्यानंतर श्री खंडोबाची मुख्यमुर्ती पालखीसह नळदुर्गला प्रस्थान होते. यावेळी भक्त श्री ला निरोप देण्यासाठी मोठयाप्रमाणावर उपस्थित असतात.
दि.4 डिसेंबर रोजी बुधवार रोजी पहाटे पाच वाजेला श्री ची श्री क्षेत्र मैलारपुर नळदुर्ग येथे प्रतिष्ठापणा होते व याच दिवशी दि.4 डिसेंबर रोजी अणदुर येथे दुपारी 2 वाजता अणदुर यात्रा कमेटि व ग्रामस्थांच्या वतीने जंगी कुस्त्याचा कार्यक्रम होतो. मल्यांनी याचा लाभ घ्यावा, यात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी अणदूर यात्रा कमिटी व देवस्थान कमिटी प्रयत्न करीत असते. यात्रेनिमित्त देवस्थान कमिटीच्या वतीने रंगरंगोटी, स्वच्छता करुन मंदिरावर अकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यानंतर नवमीच्या पुजेसाठी श्रीक्षेत्र अणदुरला प्रस्थान करते