उमरगा (लक्ष्मण पवार) : उमरगा-लोहारा तालुक्यातील कृषी पंप व पाणी पुरवठ्यांची अनाधिकृत्यांची तोडलेली वीज तोडणी पूर्ववत करण्यात यावी या प्रमुख मागणी करीता आ. ज्ञानराज चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात सोमवार दि. 23 रोजी ठिय्या अंदोलन करण्यात आले.
शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उमरगा लोहारा तालुक्यातील शेतक-यांच्या कृषीपंपाची व पाणी पुरवठयाची विज जोडणी अनाधितकृत पणे जोडण्यात आली आहे. ही जोडणी पुर्ववत करण्यात यावी, सर्व ग्राहकांचे व्याज व दंडव्याज माफ करावे, शासनाने जाहीर केल्यानुसार दुष्काळी भागातील पाणी पुरवठा योजनेचे 67 टक्के रक्कम शासनाने त्वरीत भरावे महावितरण आपल्याद्वारी योजनेतंर्गत ग्राहकांना त्वरीत वीज कनेक्शन देण्यात यावे, जळालेली डी.पी. त्वरीत बदलावे डी.पी.स लागणारे किटकॅट, ऑईल, केबल वायर यासारखे साहित्य मागणी नुसार ताबडतोब उपलब्ध करून यावे. सतत गैरहजर राहणा-या व कामचुकार लाईनमॅनवर कायदेशीर कारवाई करून त्या ठिकाणी नवीन कर्मचा-यांची तात्काळ नेमणूक करावी,कार्यालयातील रिक्तपदे तात्काळ भरावेत शेतक-यांच्या मागणीनुसार नवीन डी.पी. तात्काळ मंजूर करावेत उच्चदाबाने व सुरळीत वीजपुरवठा होण्याकरीता कायमस्वरूपी उपाययोजना अवलंबावे उमरगा व लोहारा तालुक्यातील प्रत्येक गावात सिंगल फेस व्यवस्था कार्यान्वीत करावेत भार नियमनाचा वेळ कमी करून त्याच्या वेळेत प्रत्येक आठवडयास बदल करण्यात यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या ठिय्या आंदोलनात आ. ज्ञानराज चौगुले, किरण गायकवाड, बसवराज वरनाळे, नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, जितेंद्र शिंदे, एम.ए सुलतान, बाबूराव शाहापूरे, मोहण पणूरे, बळी याकूरे, जगण पाटील, अप्पासाहेब पाटील, राम जाधव, विलास भगत, सलीम शेख, बाबासाहेब कटारे, बलभीम यवते, दिपक जोमदे, आकाश शिंदे, बालाजी शिंदे, राजेद्र सुर्यवंशी, अप्पाराव गायकवाड, आदी असंख्य सैनिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.