उस्मानाबाद :- जिल्हा ग्राहक पंचायत उस्मानाबाद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा पुरवठा विभाग यांच्यावतीने दि. 24 रोजी तहसील कार्यालय, उस्मानाबाद येथील महसूल भवन येथे ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने ग्राहकांसाठी मार्गदर्शन, चर्चासत्र व व ग्राहकांची कर्तव्य आणि जबाबदारी या विषयावर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांच्या हस्ते सकाळी 11-30 वाजता होणार आहे.
अप्पर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील हे अध्यक्षस्थान भुषविणार असून प्रमुख पाहूणे म्हणून राज्य ग्राहक पंचायतच्या सहसंघटक मेधाताई चोराखळीकर उपस्थित राहणार आहेत. या समारंभास बहुसंख्य ग्राहकांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे आणि उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी यांनी केले आहे.