पांगरी -: पुरी (ता. बार्शी) येथील सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र राज्य भु विकास बँकेचे माजी संचालक रमेश प्रल्हाद पवार यांचे अल्पआजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते 57 वर्षाचे होते. त्यांनी हयातीत विविध पदावर काम केले. त्यांच्यावर परी येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वक्षेत्रातील पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पवार यांच्या निधनाबददल बार्शी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.